दक्षता जनजागृती सप्ताहाचा कार्यक्रम प्रादेशिक परिवहन विभागासह इतर ठिकाणी संपन्न

नांदेड :- राज्य शासनाकडून 27 ऑक्टोबर ते 2  नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह-2025 “दक्षता आपली सामायिक जबाबदारी” आयोजित करण्यात आला आहे. याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता जनजागृती सप्ताहाचा कार्यक्रम आज प्रादेशिक परिवहन कार्यालयासह विविध ठिकाणी घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता दिनकर व पोलीस अंमलदार पोहेका मेनका पवार, पोका सयद खदिर व चालक पोहेका रमेश नामपल्ले यांनी नांदेड जिल्हयातील वाजेगाव, आरटीओ कार्यालय नांदेड, सिडको-हडको परिसर तसेच पोलीस अंमलदार पोहेका यशवंत दाबनवाड व चालक पोहेका साईनाथ आचेवाड यांनी कंधार पंचायत समिती व भुमी अभिलेख कार्यालय कंधार येथे जावून कार्यालयाच्या बोर्डवर व दर्शनी भागावर दक्षता जनजागृती सप्ताह- 2025 चे फलक व स्टीकर लावून तेथे उपस्थित नागरिकांना जनजागृती संबंधाने प्रचार साहित्य वाटप करून भ्रष्टाचाराबाबत काही तक्रार असल्यास तक्रार करावी. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली.

नांदेड जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांच्या भेटी घेवून सर्व शासकीय इमारतीमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी दर्शनीय भागावर भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीबाबत तयार करण्यात आलेले पोस्टर, बॅनर व स्टिकर लावून जनजागृती मोहिम राबविली जात आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी शासकीय अधिकारी-कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात पुढील क्रमांकावर संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पालवे : 02462-255811, मो. नंबर 9226484699.

अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम : 02462-255811

पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार : मो नंबर 9359056840.

टोल फ्रि : 1064.

ला.प्र.वि. नांदेड दुरध्वनी क्रमांक : 02462-253512.

वेबसाईट : www.acbmaharashtra.gov.in

मोबाईल ॲप : www.acbmaharashtra.net

फेसबुक पेज : www.facebook.com/maharashtraACB

टिव्टर : @ACBnanded

इन्स्ट्राग्राम :  acb_nanded

युट्यूब : @Anti Corruption BureauNanded.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!