हदगाव (प्रतिनिधी\)-हदगाव शहरातील खुदबई नगर भागात 21 ऑक्टोबर रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे. नेहमी त्रास देणाऱ्या नवऱ्याचा पत्नीने आपल्या भावांच्या मदतीने खून केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
मुजाहिद मोईन मिर्झा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारास सहा वाजता त्यांचे मोठे भाऊ मुखीद मोईन मिर्झा (वय 32) यांच्यावर त्यांची पत्नी समीना मुखीद मिर्झा, तसेच समिनाचे भाऊ सोहेल कलीम शेख आणि आसिफ कलीम शेख या तिघांनी मिळून हल्ला चढवला. जुन्या कौटुंबिक वादातून ही मारहाण झाली असून, या मारहाणीत मुखीदम मिर्झा यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी हादगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 358/2025 नोंदवण्यात आला आहे. हादगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपी समीना मुखीद मिर्झा आणि तिचा भाऊ सोहेल कलीम शेख यांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, आणखी एक आरोपी आसिफ कलीम शेख फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या घटनेमुळे खुदबई नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
