नांदेड(प्रतिनिधी)-बनावट महिला बचतगट तयार करून त्यांच्या नावावर कर्ज मंजुर करून सदस्याचा विश्र्वासघात करत त्यांच्या एटीएम कार्डचे पासवर्ड घेवून त्यांच्या परवानगीशिवाय 30 लाख 86 हजार 260 रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एचडीएफसी बॅंक शाखा भोकर येथील क्लस्टर हेड आनंद सुर्यकांत कडतन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मे 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान बॅंकेतील सेल्स ऑफीसर पंकज संतोष पवार, के्रडीट ऑफीसर कुणाल इंदल राठोड, कॅशीअर सचिन बाबुराव कांबळे आणि दयानंद कृष्णाजी गोडबोले यांनी संगणमत करून महिला बचगटाचे बनावट सदस्य तयार केले. त्यांच्या नावे कर्ज मंजुर करून घेतले. सदस्यांचा विश्र्वास संपादन करून त्यांच्या एटीएमचे पासवर्ड मिळवले आणि सदस्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खात्यातून 30 लाख 86 हजार 260 रुपये काढून घेतले. सदस्यांच्या कर्ज हप्त्याची रक्कम बॅंकेत भरलीच नाही. भोकर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 495/2025 भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420, 34 नुसार दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक शैलेंद्र औटे अधिक तपास करीत होते. पण सध्या हा गुन्हा नांदेड येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
बॅंकेच्या अधिकाऱ्यांनीच बनावट महिला बचतगट सदस्य तयार करून 31 लाखांची फसवणूक केली
