नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी उड्डाणपुलाजवळ 13 ऑक्टोबर रोजी सकाळी एका जिपला अडवून त्यातील प्रवाशांकडून तीन जणांनी धाक दाखवून 1 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सकाळी 5.30 वाजेची आहे. खरे तर या रस्त्यावर त्यावेळेस पोलीस गस्त असायला हवी. पण गस्त नसल्यामुळेच हा प्रकार घडला आहे.
श्रीहरी ग्यानबा साखरे हे वाहन चालक आहेत. 13 ऑक्टोबर रोजी ते आपले जिप क्रमांक एम.एच.23 ई.3457 मध्ये प्रवाशी घेवून कळमनुरीकडे जात असतांना माळटेकडीजवळ एका दुचाकीवर 3 जण आले आणि त्यात तिघांनी प्रवाशांना धाक दाखवून सोन्याचे दागिणे 3 मोबाईल असा एकूण 1 लाख 43 हजार रुपयांचे ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 416/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे हे करीत आहेत.
हजेरी अजूनही उशीराच
वास्तव न्युज लाईव्हने रात्रीची हजेरी उशीरा होते अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द केले होते. वृत्त लिहितांना अपेक्षीत हे असते की, त्याच्या मतितार्थाला समजून त्या कामामध्ये सुधारणा व्हावी. परंतू असा काही फरक विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांवर पडला आहे असे दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी सुध्दा विमानतळ पोलीस ठाण्यात रात्री 10.05 वाजताच हजेरी झालेली आहे.
