नांदेड(प्रतिनिधी)-दि.22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या थाटा-माटात साजरा करण्यात आला. आज दि.3 ऑक्टोबर रोजी शहरातील अनेक भागातील दुर्गा मंडळांनी रात्री उशीरापर्यंत दुर्गा मातेचे विसर्जन शांतते पार पाडले. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाने शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
नांदेड शहरास जिल्हा भरात अनेक ठिकाणी दुर्गा मातेची घटस्थापनेच्या दिवशी स्थापना केली गेली. या नऊ दिवशीय दुर्गा महोत्सवात विविध दुर्गा मंडळांकडून धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अन्नदानाचेही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पाडले. याच बरोबर नवरात्रीय गरबा देखील उत्साहात महिला मंडळांनी साजरा केला. सुरूवातीच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे यावर्षीच्या नवरात्र महोत्सवा युवक-युवती यांना दांडिया किंवा गरबा खेळण्यासाठी पाऊस मोठ्या प्रमाणात अडचण ठरेल असे वाटत होत. मात्र शेवटेच तिन दिवस पाऊसाने दांडी मारल्यामुळे दुर्गामंडळात चैतन्य निर्माण झाले. दि.3 ऑक्टोबर रोजी शहरातील अनेक भागातून दुर्गा मातेची मिरवणूक काढून गोदावरी घाटासह, शहराच्या शेजारी असणार्या झरी येथील खदानीत रात्री उशीरापर्यंत दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात आले. यासाठी नांदेड जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पेालीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शारदीय नवरात्र दुर्गा मातेचे थाटात विसर्जन
