नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ संबंधाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यंानी सप्टेंबर महिन्यातील आपला एक महिन्याचा पगार पुरग्रस्त निधीसाठी वर्ग करावा अशी विनंती पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना केली आहे.
नांदेड शहरात आणि जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराने थैमान घातले असून त्यात अनेक पुरपिडीत झाले आहेत. मी सुध्दा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कुटूंबाचा सदस्य असून माझ्या गावात सुध्दा पुरग्रस्त परिस्थिती आहे. त्यामुळे पुरामुळे होणाऱ्या त्रासाची जाणिव मला आहे. प्रशासकीय काम करत असतांना सामाजिक बांधलकी म्हणून मी माझ्या सप्टेंबर महिन्यातील एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, एनजीओ किंवा आपल्या स्तरावरून ज्याला द्यावे वाटते त्या संस्थेला माझे पगार जवळपास 1 लाख रुपये वर्ग करावेत अशी विनंती चिंचोळकर यांनी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना केली आहे. या लेखी विनंती पत्राचा जावक क्रमांक 6830/2025 दि.27 सप्टेंबर 2025 असा आहे.
पोलीस निरिक्षक चिंचोळकरांची सामाजिक बांधलकी सप्टेंबर महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी
