नांदेड(प्रतिनिधी)-15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास लोहा-कंधार रस्त्यावर मुखेड फाट्याजवळ दोन दुचाकी एक दुसऱ्यावर आदळून दोन्ही चालकांचा मृत्यू झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.एन.4214 आणि स्कुटी क्रमांक एम.एच.26 सी.टी. 0026 या दोन दुचाकी एक दुसऱ्यावर आदळ्या दुचाकी क्रमांक 4214 लोहाकडून येत होती आणि स्कुटी क्रमांक 0026 कंधारकडून चुकीच्या दिशेने आली आणि दोन्ही गाड्यांची आपसात टक्कर झाली. या दोन्ही दुचाकी चालविणारे मरण पावले आहेत. त्यांची नावे संजय रोहिदास जोंधळे (36) रा.शिवाजी चौक कंधार आणि शेख तौफीक शेख रफिक(17) रा.आसननगर कंधार अशी आहेत. या प्रकरणाची पुढील कार्यवाही पोलीस ठाणे कंधार हे करीत आहे.
दोन दुचाकीची समोरा-समोर धडक दोन्ही चालकांचा मृत्यू
