नांदेड :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर सकाळी 9 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल. या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये. या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 705 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राष्ट्रीय लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यात विक्रमी प्रकरणे निकाली ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर