नांदेड(प्रतिनिधी)-केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टाकल्यामुळे कोटतिर्थ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दुर्देवी झाली असून तो रस्ता दुरूस्त करून देण्याचे पत्र कोटतिर्थ ग्राम पंचायत कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहे. यावर सरपंचांची स्वाक्षरी आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानअंतर्गत नांदेड शहर पाणी पुरवठा योजना बळकटीकरण करण्यासाठी कोटतिर्थ येथून पाईपलाईन अंथरण्यात आली आहे. ही पाईपलाईन अंथरतांना कोटतिर्थकडे जाणाऱ्या रस्त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गावकऱ्यांना या रस्त्यावरून ये-जा करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाईप लाईन डांबर रस्त्याला लागून टाकली असल्यामुळे रस्ता अतिशय खराब झाला आहे. काम करून त्या कंत्राटदाराने मुरूम टाकलेला नाही आणि बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनसाठी केलेेले खोदकाम तसेच आहे.
महानगरपालिका आयुक्तांनी कोटतिर्थ गावात होत असलेल्या त्रासाचा विचार करून त्वरीत प्रभावे हा रस्ता दुरूस्त करून द्यावा नाही तर कोटतिर्थ गावकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येईल असे निवेदनात लिहिले आहे.
संबंधीत व्हिडीओ….
कोटतिर्थ गावात नांदेडसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमुळे रस्त्याची दुरावस्था
