नांदेड(प्रतिनिधी)–मातंग समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण हे कमी आहे. त्यामुळे हा समाज विटभट्टी, ऊसतोड ईतर मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. आता काहीशी परिस्थिती बदलत चालली आहे. या बदलत्या युगात समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेवून आयएएस, आयपीएस बनण्याचे स्वप्न पहावे असे आवाहन लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष नागोराव आंबटवार यांनी केले.
मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे दि.30 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वाघमारे, लहुजी शक्ती सेना कोअर कमिटीचे जिल्हाध्यक्ष संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस राम साबळे, आमदुरा नगरीच्या सरपंच शितल गोरखवाड, मुख्याध्यापिका कांबळे, शिक्षक गायकवाड, मुदखेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गोडसे, पोहेकॉ कौठेकर, अंगद कदम, लहुजी शक्ती सेनेचे मुदखेड तालुका अध्यक्ष जयवंतराव गोरखवाड आदिंची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना आंबटवार म्हणाले की, गावागावामध्ये डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. जयंती निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यामुळे समाज आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मातंग समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी प्रमाणात दिसत आहे. 10 वी, 12 वी नंतर समाजातील युवक व युवती शिक्षणापासून दूर जात आहेत. त्यामुळे उच्च शिक्षण घेतांना समाजातील युवक दिसत नाहीत. युवकांनी उच्च शिक्षण घेवून आयएएस व आयपीएस होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदुरा येथे लहुजी शक्ती सेना शाखेच्या फलकाचे अनावरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, उपाध्यक्ष सुनील गोरखवाड, आमदुरा शाखेचे अध्यक्ष गेंदाजी गायकवाड, गोविंद गायकवाड, सुकेश गायकवाड, त्यांच्याबरोबरच आमदुरा येथील युवक मित्र, महिला मंडळी व प्रतिष्ठीत नागरिक यांनी प्रयत्न केले.
