महिलेच्या कानातील बाली तोडली; महिलेच्या गळ्यातील चैन तोडली; बस वाहकाचे घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-दशमेश हॉस्पीटलसमोर उभ्या असलेल्या एका 70 वर्षीय महिलेच्या कानातील बाली बळजबरी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. आनंद नगर ते व्हिआयपी रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी तोडून नेली आहे. किनवटमधील गोकुंदा भागात बंद असलेले घरफोडून चोरट्यांनी 30 हजारांचा ऐवज लांबला आहे.
रविंद्रसिंघ राखासिंघ धुने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 ऑगस्टच्या रात्री 11.30 वाजेच्यासुमारास उषा बन्सीलाल जुनेजा (70) या महिला गल्ली क्रमांक 3 मधून एनआरआय निवासकडे जात असतांना दशमेश हॉस्पीटलसमोर असलेल्या अंधाराचा फायदा घेवून कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी उषा जुनेजा यांच्या कानातील सोन्याची बाली 4.50 गॅ्रम वजनाची किंमत 27 हजार रुपये बळजबरीने तोडून नेली आहे. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 367/2025 नुसार दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे अधिक तपास करीत आहेत.
जयश्री त्र्यंबक ढवळे या 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2.35 ते 2.45 वाजेदरम्यान आनंदनगर ते व्हीआयपी रस्त्यावर आपल्या दुचाकी गाडी क्रमांक एम.एस.26 सी.डी.4315 वर बसून प्रवास करत असतांना वसंतनगर येथील मेडिकल समोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन किंमत 60 हजार रुपयांची बळजबरीने तोडून पळून गेले आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 328/2025 नुसार दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक कदम हे अधिक तपास करीत आहेत.
गोकुंदा येथील एकविरा मंदिर परिसरात राहणारे बस वाहक वसंत नामदेव पिटलेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास ते बाहेरगावी असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा, कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील लॉकरमधील दहा हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे 20 हजार रुपये किंमतीचे असा एकूण 30 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 268/2025 नुसार दाखल केली असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कलाळे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!