नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण, उस्माननगर आणि कंधार पोलीसांनी अवैध वाळू उत्खन्न आणि वाहतुक करणाऱ्यांविरुध्द जबर कार्यवाही करत 85 लाख 87 हजार रुपयांच्या गाड्या आणि के्रन जप्त केल्या आहेत.
उस्माननगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.21 ऑगस्टरोजी कौडगाव जुने ता.लोहा येथील गोदावरी नदीपात्रात पोलीसांनी छापा टाकला. त्याठिकाणी काही जण बोटीतून रेती उपसा करून ती नदीपात्राच्या काठी आणून टाकत होते. तसेच त्या ठिकाणी दोन क्रेन होत्या. पोलीसांना पाहुन बोटी घेवून काही वाळू माफिया गोदावरी नदीपात्राच्या दुसऱ्या काठावर पळून गेले. पोलीसांनी त्या ठिकाणी एम.एच.26 सी.पी. 3425 आणि एमएच.26 सी.ई.9225 क्रमांकाच्या दोन क्रेन जप्त केल्या याची किंमत 45 लाख रुपये आहे. तसेच नदीकाठावर जमा केलेली 10 ब्रास वाळू 42 हजार रुपयांची असा 45 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कार्यवाही उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गंगाधर चिंचोरे, तुकाराम जुन्ने, प्रकाश पद्देवाड आणि काही गृहरक्षक दलाच्या जवानांनी केली. पोलीस अंमलदार तुकाराम जुन्ने यांच्या तक्रारीवरून पांडूरंग गोविंद मोरे (36) रा.खैरका ता.मुखेड, महेश मेवालाल प्रसाद (34) रा.वसरणी नांदेड आणि पळून गेलेल्या बोटचे चालक व मालक यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 214/2025 दाखल केला आहे.
कंधार पोलीसांनी नागलगाव शिवार रस्त्यावर दि.23 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर तपासणी करत असतांना एका बिना क्रमांकाचा हायवा त्यांनी थांबवलाआणि तपासणी केली. त्यामध्ये बिना परवाना पाच ब्रास वाळू 30 हजार रुपये किंमतीची भरलेली हेाती. कंधार येथील पोलीस अंमलदार सुनिल साखरे यांच्या तक्ररीवरुन हनमंत शेषराव शेंडगे (35) रा.गोळेगाव ता.ेलाहा यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 295/2025 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 30 हजार रुपयांची वाळू आणि 25 लाखांचा हायवा असा 25 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे. ही कार्यवाही पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कागणे, पोलीस अंमलदर सुनिल साखरे आणि प्रकाश टाकरस यांनी पुर्ण केली.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी 23 ऑगस्ट रोजी वाजेगाव ते वांगी लाणाऱ्या रस्त्यावर एम.एच.04 ईएल 3267 या टिपपरची तपासणी केली त्यामध्ये 15 हजार रुपयांची अवैध वाळू भरलेली होती. पोलीस अंमलदार जमीर शफीक अहेमद यांच्या तक्रारीवरुन संभाजी नरबाजी टापरे (35) रा.लालवाडी जि.नांदेड विरुध्द गुन्हा क्रमांक 813/2025 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, शेख आसीफ, धम्मपाल कांबळे, सिध्देश्र्वर कौठेकर, ए.जी. सय्यद यांनी ही कार्यवाही केली. या प्रकरणात 15 लाखांचा टिप्पर आणि 15 हजारांची वाळू असा 15 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

