नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीच्यानंतर होणार असल्याची माहिती समोर येत असतांनाच या निवडणुकीत मात्र व्हीव्ही पॅट वापरले जाणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणुक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
प्रदीर्घ काळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणुक विभागाने हातात घेतला. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेग आला असला तरी या निवडणुका दिवाळीच्यानंतरच होणार असल्याची माहितीही समोर येत आहे. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती अशा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका दोन टप्यात होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. नुकतेच न्यायालयाने ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणाप्रमाणे आरक्षण जाहीर करून निवडणुका घ्याव्यात असे जाहीर केले असल्याने एकीकडे ओबीसी वर्गामध्ये आनंद असला तरी दुसरीकडे मात्र राज्य निवडणुक आयुक्तांनी या निवडणुकीत व्हीव्ही पॅट मशीन वापरली जाणार नसल्याची शक्यताही वर्तवली आहे. या निवडणुकीत या मशीन का वापरल्या जाणार नाहीत याची माहिती देत असतांना निवडणुक आयुक्त म्हणाले की, राज्य निवडणुक आयोगाच्या आख्त्यारीत ज्या निवडणुका होतात. त्यावेळी व्हीव्हीपॅट मशिनचा वापर केला जात नाही. कारण एका पेक्षा जास्त प्रभाग पध्दत असते. त्यामुळे एकापेक्षा जास्त उमेदवार निवडूण द्यायचे असतात आणि त्यांची मतमोजणीही करायची असते. अशा कारणामुळे या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरल्या जात नाहीत अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिक येथील पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट असणार नाही?
