नांदेड(प्रतिनिधी)-चुकीच्या ठिकाणी उभी असलेली गाडी काढण्यास सांगितली म्हणून तीन जणांनी केरोळी फाटा ता.माहुर येथे एका बस चालकाला मारहाण केली आहे.
माहुर आगाराचे बस चालक रणजित श्रीराम इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेच्यासुमारास ते आपली बस घेवून जात असतांना केरोळी फाटा येथे प्रफुल्ल नारायण राठोड, विवेक गणेश राठोड आणि एक इतर ज्याचे नाव माहित नाही रा.शेकापुर ता.माहूर यांना चुकीच्या दिशेने उभी केलेली गाडी बाजुला करण्यास सांगितली तेंव्हा या तिघांनी चालक रणजित इंगोलेला हातातील कड्याने नाकावर, तोंडावर व पाठीवर मारुन जखमी केले आहे आणि जिवे मारण्याची धमकी दिली आहे. माहुर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 138/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक ब्राम्हण अधिक तपास करीत आहेत.
बस चालकाला मारहाण
