नांदेड :- आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी डेंग्यू उद्रेक गावं टाकराळा प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम ता. हिमायतनगर येथे डेंग्यू रूग्णास भेट देऊन पाहणी केली व गावातील ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी यांना कंटेनर सर्वे, ताप रूग्ण सर्व्हेक्षण, धुरफवारणी, अळीनाशक औषधी फवारणी, नाल्या गटार वाहती करणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गावात साथ आटोक्यात येई पर्यंत वैद्यकीय पथक कार्यरत ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड,डॉ नखाते वैद्यकीय अधिकारी सरसम व संजय भोसले जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक, शंकर मलदोडे किटक समहारक, प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा उपस्थित होते..
More Related Articles
जय श्रीरामच्या घोषणांनी आसमंत दुमदुमले
नांदेड,(प्रतिनिधी)-आज चैत्र शुध्द नवमी अर्थात प्रभु श्री.रामचंद्रजींचा जन्मदिवस. हजारो वर्षांपासून हा दिवस कोणताही प्रचार न…
शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट; शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही
नांदेड :- देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या…
हिमायतनगर पोलीसांनी अवैध मद्य पकडले ; पाच जणांना अटक दोन फरार
नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीसांनी 22 जानेवारी रोजी त्यांच्या हद्दीतील 3 ठिकाणी पाच जणांना पकडून त्यांच्याकडून एकूण 15…
