नांदेड जिल्हा पोलीस दलातून 20 जण सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-आज नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक पोलीस उपनिरिक्षक, पाच श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, नऊ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले आहेत. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी सर्व सेवानिवृत्त पोलीसांना सत्कार करून निरोप दिला.
आज जिल्हा पोलीस दलातून एक पोलीस एक पोलीस उपनिरिक्षक, पाच श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, नऊ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पोलीस उपनिरिक्षक शेख नईमोद्दीन मोईनोद्दीन (महामार्ग अर्धापूर), श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आनंद किशनराव वाघमारे (नायगाव), रमेश सोनबा कांबळे(ईस्लापूर), मारोती गंगा परगेवार(रामतिर्थ), शेख पाशा शेख मौलाना, भिमानंद हरीहर महाबळे (पोलीस मुख्यालय), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दिगंबर घनशाम शाहपुरे, मस्णाजी गंगाराम जाधव( पोलीस मुख्यालय), भानुदास नामदेव बोकारे(सोनखेड), साहेबराव महादु नल्लेवाड(शहर वाहतुक शाखा), मारोती किशन गोटमवाड(नांदेड ग्रामीण), पोलीस अंमलदार दिलीप भोजूसिंग राठोड (भाग्यनगर), तुकाराम किशन बोईनवाड, लालजी रामसिंग आडे(अर्धापूर), नाथ विठ्ठलराव कुलकर्णी (नियंत्रण कक्ष), प्रकाश व्यंकटराव तमलुरे(रामतिर्थ), विजय खंडूराव धुळगंडे(विमानतळ), गंगाधर महिपती नरबाग(मुक्रामाबाद), रंगनाथ एकनाथ भारती (उस्माननगर), नागनाथ माणिका बासरे(पोलीस मुख्यालय).
या कार्यक्रमात सेवानिवृत्तांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेट वस्तु देण्यात आली. हा कार्यक्रम पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात पार पडला. पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक जगदीश मंडलवार, पोलीस उपनिरिक्षक तथा जनसंपर्क अधिकारी जे.ए.गायकवाड यांच्यासह सर्वसेवानिवृत्तांचे कुटूंबिय, अनेक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस अंमलदार रुक्मीण कानगुले यांनी केले. श्रेणी पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, मारोती कांबळे, नरेंद्र राठोड आणि सविता भिमलवार यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!