नांदेड(प्रतिनिधी)- जागतिक अवयवदान निमित्त 3 ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शहरातील आयटीआय परिसरातील महात्मा फुले पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या सुचनेनुसार जागतिक अवयवदान दिनानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला खा.अजित गोपछडे, खा.प्रा.रविंद्र चव्हाण, माजी आमदार गंगाधर पटने,डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय पेरके,डॉ.दिपक शिंदे,अर्पणचे अध्यक्ष माधव अटकोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रथम अवयवदान प्रतिज्ञा वाचन करण्यात येईल. त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे भाषण होतील. आणि रॅलीत सहभागी होणारे शासकीय, खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठानचे प्रमुख, विद्यार्थ्यांसह, परिचारिका,डॉक्टर, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
जागतिक अवयवदान दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
