नांदेड(प्रतिनिधी)-घराकडे पाहुन लघवी का करतोस असे विचारल्यानंतर त्यांना मारहाण सोबत कुटूंबियांना मारहाण करणाऱ्यांना लोकांना मारहाण करणाऱ्यापैकी एकाला कंधार येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी के.एस.खंदारे यांनी एक वर्ष साधी कैद आणि 5 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.
पानभोसी ता.कंधार येथील राजू नारायण डुबकवाड यांनी दि.21 नोव्हेंबर 2013 रोजी लक्ष्मण पिराजी डुबूकवाड याला माझ्या घराकडे तोंड करून लघवी का करतोस अशी विचारणा केली. तेंव्हा लक्ष्मणने त्याचे भाऊ माधव डुबूकवाड, केशव डुबूकवाड, बळी डुबुकवाड, दिगंबर डुबूकवाड, पिराजी डुबूकवाड यांना बोलावले. हे सर्व लोक हातात काठ्या घेवून आल्या होते. त्यांनी तक्रारदार राजू डुबूकवाड, त्यांचा भाऊ बाबू, त्यांच्या आई यांना देखील मारहाण केली. या घटनेत भाऊ बाबुचा हात फॅक्चर झाला. लोहा पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 326 गुन्हाा क्रमांक 80/2013 दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक पेचे यांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या प्रकरणी सरकार पक्षाने 9 साक्षीदारांच्या जबान्या न्यायालयासमक्ष नोंदवल्या. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा आणि युक्तीवाद ग्राहय मानुन कंधार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के.एस.खंदारे यांनी बळीराम पिराजी डुबूकवाडला एक वर्ष साधी कैद व 5 हजार रुपये रोख दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. कल्याणी कुलकर्णी यांनी काम पाहिले. पोलीस ठाणे लोहा येथील पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार उत्तम घुगे यांनी त्यांना सहकार्य केले.
घराकडे तोंड करून लघवी केल्यानंतर मारहाण करणाऱ्याला कंधार न्यायालयाने ठोठावली शिक्षा
