नांदेड –साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी पुतळा परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने होईल. त्यानंतर सुभेदार रामजी आंबेडकर (सेनि. पोलिस अधिकारी, नांदेड) यांच्या वतीने मानवंदना दिली जाईल. अभिवादन सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजभूषण पुरस्कार वितरण व व्याख्यान कार्यक्रमहोणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. अविनाश घाटे, उद्घाटक खासदार रवींद्र चव्हाण, तर स्वागताध्यक्ष अॅड. सुरेंद्र घोडजकर असतील. प्रमुख पाहुण्यांमध्ये खासदार अशोकराव चव्हाण, आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंडारकर, राजेश पवार व आमदार श्रीजया चव्हाण यांचासह जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली समावेश आहे.
यावेळी आदिनाथ इंगोले व केशव शेकापूरकर यांचे व्याख्यान तसेच ‘निळ्या आकाशातील लाल वादळ’ या संचाचे गीतगायन सादर होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमस्ते नांदेड या youtube चॅनल च्या निवेदिका प्रियंका गायकवाड या करणार आहेत. जयंती मंडळाचे अध्यक्ष नागेश तादलापूरकर, सचिव ईश्वरअण्णा जाधव व संयोजक गणेश अण्णा तादलापूरकर यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
