पूर्णा,(प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेमध्ये मेल ड्रायव्हर पदावर कार्यरत असलेले रावण निवृत्ती वाघमारे (वय अंदाजे ८० वर्षे) यांचे काल, दिनांक २७ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पूर्णा येथील स्मशानभूमीत २७ जुलै रोजी सायंकाळी त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.
रावण वाघमारे हे सेवानिवृत्तीपूर्वी दक्षिण मध्य रेल्वेमध्ये मेल ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतरही त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत सुखद जीवन व्यतीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.रावण निवृत्ती वाघमारे यांच्या अंतिम यात्रेत त्यांचे कुटुंब,त्यांचे सहकारी,मुलांचे मित्र असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
वास्तव न्यूज लाईव्ह वाघमारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.
