नांदेड,(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यभरातील 341 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक ही पदोन्नती दिली आहे हे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुप्रिया पाटील यादव यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत
नांदेड जिल्ह्यातील 13 जणांना सहायक पोलीस निरीक्षक ही पदोन्नती प्राप्त झाली आहे. राज्य शासनाने 341 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक ही पदोन्नती दिली आहे. त्यातील नांदेड जिल्ह्यात 13 अधिकारी आहेत. नांदेड जिल्ह्यातील राजेश डोकेवाड- सोलापूर, शेख आयुब- छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग, अमोल गुंडे- अमरावती परिक्षेत्र, गोपाल इंद्राळे- अमरावती परीक्षेत, मनीषा गिरी- नागपूर शहर, कपिल टर्के पाटील- अमरावती परिक्षेत्र, योगेश बोधगिरे- गडचिरोली परीक्षेत, साईप्रसाद केंद्रे- नागपूर शहर, राधिका भावसार- मुंबई शहर, कृष्णा सोनुले- गडचिरोली परिक्षेत्र, जयश्री गिरे – नागपूर शहर, आनंद विचेवार- नागपूर शहर.
नांदेड येथे येणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुढील प्रमाणे आहे बीड इथून प्रल्हाद जाधव,परभणीतून चितरंजन ढेमकेवाड, पुणे ग्रामीण येथून शरद घोडके यांना सुद्धा पदोन्नती मिळाली आहेत आणि त्यांची नियुक्ती नांदेड पोलीस परिक्षेत्रात करण्यात आली आहे
एपीआय बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची पीडीएफ संचिका बातमी सहज जोडली आहे.
25.07.2025 PSI ते API अशी पदोन्नती एकूण 341-compressed (1)
