शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी; कारवाईत चालकांकडून 7 लाख 4 हजार रुपयाचा दंड वसूल

नांदेड  :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत 18 ते 30 जुन 2025 कालावधीत वायुवेग पथक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची मोटार वाहन कायद्यातील तरतूदी व प्रचलित शासन नियमानुसार तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेत स्कुल बसची सर्व वैध कागदपत्रे व बसची तपासणी करण्यात येते. या कारवाईत 89 बसेसवर कारवाई करण्यात आली असून 7 लाख 4 हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.

 

या तपासणी दरम्यान वैध कागदपत्रे सादर न करणाऱ्या, विनापरवाना अथवा परवान्याच्या अटीचा भंग करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनात बेकायदेशीर फेरबदल करणे, सीसीटीव्ही व ट्रकींग प्रणालीचा वापर न करणे, शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतुक करणाऱ्या, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्याची वाहतुक करणाऱ्या, वैध स्कुलबस परवाना नसलेल्या तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन न करणाऱ्या स्कुलबसेसवर दंडात्मक तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

 

जिल्ह्यातील सर्व संघटना, स्कुलबस चालक-मालक यांनी स्कुलबस तपासणी दरम्यान दंडात्मक व मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही टाळावी. यासाठी शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतुक करू नये. वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनूसार तपासणी दरम्यान मागणी केल्यास वैध कागदपत्रे सादर करावीत. शालेय विद्यार्थ्याची वाहतूक नियमानुसार करावी. वाहन अटकाव व दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!