राज्यातील 183 पोलीस अंमलदार झाले पोलीस उपनिरिक्षक ; नांदेड जिल्ह्याचे 11

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी राज्यभरातील 183 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक ही पदोन्नती दिली आहे. त्यासाठी 2024-25 ची निवड सुची आणि पदोन्नतीचा 25 टक्के कोटा संदर्भात घेण्यात आला आहे. या आदेशावर विशेष पोलीस महानिरिक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील यादव यांची स्वाक्षरी आहे. या यादीत नांदेड जिल्ह्याचे 11 पोलीस अंमलदार पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत.
राज्यभरात 183 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक होण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे. त्यात नांदेड जिल्ह्याचे 11 पोलीस अंमलदार आहेत. त्यांची नावे आणि नवीन नियुक्ती पुढील प्रमाणे आहे. उस्मान अबुबकर चाऊस-नांदेड परिक्षेत्र, रामेश्र्वर किशनराव कत्ते-नांदेड परिक्षेत्र, अंगद रघुनाथ कोतवाड-नागपूर रेल्वे, मुजिब खॉ अजिज खॉ पठाण-नागपूर (एएनटीएफ), इरशाद खयुम बेग-कोकण परिक्षेत्र-2 (महामार्ग सुरक्षा पथक), बाबु नानु जाधव-नांदेड परिक्षेत्र, मिर्झा अख्तर बेग मिर्झा कासीम बेग-नागपूर रेल्वे, शेख इकबाल शेख अन्सार अलीम मोमीन-कोकण परिक्षेत्र, प्रभाकर आबाराव क्षीरसागर-नागपूर शहर, रेणुकादास नागनाथराव हामंद-मुंबई रेल्वे, भगवान व्यंकटराव महाजन-कोकण परिक्षेत्र.
वाचकांच्या सोयीसाठी पोलीस महासंचालकांनी जाहीर केलेली राज्यभरातील 183 पोलीस अंमलदार ते पोलीस उपनिरिक्षक यादी पीडीएफ संचिकेत बातमीसोबत जोडली आहे.

30dc7902134f86d6eb4eee8fd5c1f943

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!