नांदेड- राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 18 जुलै 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 1 ऑगस्ट 2025 पर्यत अंतिम मुदतवाढ दिली आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज लवकरात लवकर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्चपथ, पुणे-01 यांचेस्तरावर अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
