नांदेड(प्रतिनिधी)-एका नवऱ्याने पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून स्वत:च आगलावून पेटवून घेत आत्महत्या केली आहे. हा प्रकार मौजे अर्जापूर ता.बिलोली येथे घडला आहे.
शामराव हनमंतराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे बंधू आनंदा हनमंतराव जाधव (40) यांनी 20 जुलै रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास आपल्या घरी स्वत:च्या हातानी आग लावून आत्महत्या केली आहे. याचे कारण स्पष्ट करतांना फिर्यादीत लिहिले आहे की, त्यांची पत्नी राजश्री आणि अर्जापूर येथील शंकर लिंगप्पा पांचाळ यांच्यामधील अनैतिक संबंधांना तो त्रासला होता. कुंडलवाडी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 133/2025 राजश्री जाधव आणि शंकर पांचाळ विरुध्द दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक गजेंद्र मांजरमकर हे करीत आहेत.
पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून नवऱ्याची आत्महत्या
