पंतप्रधान सभागृहातून गेले, पण जबाबदारी कोणी घेतली? संसदेतील गोंधळाचा परखड आढावा  

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले, तेव्हा नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाच्या बाहेर उभे राहून भारतीय जनतेला उद्देशून काही शब्द सांगितले. त्यांनी वापरलेले शब्द आणि मांडलेले प्रश्न लक्षणीय होते. हेच प्रश्न सभागृहात येताच समोर आले आणि काही वेळातच पंतप्रधान मोदी सभागृहातून निघून गेले. कारण उद्या रात्री त्यांना युनायटेड किंगडम आणि मालदीवच्या दौऱ्यावर जायचे आहे, त्यामुळे तयारीसाठी वेळ राखून ठेवावा लागेल. याचा अर्थ असा की, संसदेच्या अधिवेशनासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.इतिहासात पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकदा आपला दौरा रद्द करून संसदेत उपस्थित राहून विरोधकांचे सर्व मुद्दे ऐकले आणि त्यावर सविस्तर उत्तर दिले होते. त्यानंतरच अधिवेशन समाप्त झाले होते.

आजच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळात गेला. सभागृह सुरू झाल्यानंतर केवळ आठ मिनिटांत ते स्थगित करण्यात आले. नंतर अर्ध्या तासाने पुन्हा सुरु झाले, पण पुन्हा ते दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे सभागृह व्यवस्थित चालू शकले नाही.विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न चुकीचे नाहीत. त्यांना ऑपरेशन सिंदूरमधील त्रुटींबद्दल विचारायचे आहे. त्यांना हेही विचारायचे आहे की डोनाल्ड ट्रम्प सतत २४ वेळा भारताशी युद्धविरामाची भाषा का करतो?सरकार या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करत आहे. ट्रम्प कोणी सामान्य नेता नाही; त्याने पाच लढाऊ विमाने पाडली गेली असल्याचे म्हटले होते. आम्हीही एक विश्लेषण प्रकाशित केले होते, ज्यात राफेल उडवणारी भारतीय महिला पायलट शिवांगी सिंग यांचा संदर्भ दिला होता. आजपर्यंत ती कुठे आहे, याचा पत्ता नाही आणि सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान नेमकं काय घडलं? पहलगाम हल्ल्याचे अतिरेकी अद्याप पकडले गेले नाहीत. पुलवामा हल्ल्यानंतर जसा राजकीय फायदा मिळवण्यात आला, तसा यावेळीही तो मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या भाषणानंतर केंद्र सरकारने जवळपास ६० खासदार वेगवेगळ्या देशांत पाठवले. उद्देश होता की पाकिस्तान भारतावर अतिरेकी हल्ले कसे करतो, हे जागतिक व्यासपीठावर सांगणे. मात्र कोणत्याही देशाने भारताच्या बाजूने थेट समर्थन जाहीर केले नाही.सभागृह सुरू होताच इंडिया गटबंधनातील खासदारांनी बॅनर आणि फोटोंसह घोषणाबाजी केली. सभापती ओम बिर्ला यांनी यास हरकत घेतली आणि सभागृहाचे कामकाज आठ मिनिटांत स्थगित करण्यात आले. नंतर सभापती जगदंबिका पाल यांनीही विरोधकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे पुन्हा सभागृह दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृह सोडून गेले. सभागृह स्थगित करण्याआधी ओम बिर्ला यांनी दोनदा विचारले की, “तुम्हाला सभागृह चालू द्यायचे नाही का?” विरोधक, विशेषतः राहुल गांधी, अखिलेश यादव आणि त्यांचे समर्थक खासदार वेलमध्ये उभे राहिले, त्यामुळे कार्यवाही पूर्णतः विस्कळीत झाली.माध्यमांमध्ये पंतप्रधान पळून गेले, अशी टीका होत असली, तरी आम्ही एवढे खालच्या पातळीवर जात नाही. मात्र, त्यांनी सभागृह सोडून दिले हे नोंदवण्यास हरकत नाही.विरोधकांचा मुख्य मुद्दा असा आहे की, ऑपरेशन सिंदूर आणि पहलगामवरील चर्चा प्रथम व्हावी. भाजपने सांगितले की आम्ही चर्चा करू, पण ती कधी याचे उत्तर दिलेले नाही. बिजनेस अ‍ॅडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत प्रस्ताव दिल्यास चर्चा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, विरोधकांना हे निव्वळ वेळकाढूपणा वाटत आहे. म्हणूनच त्यांनी सभागृह सुरू होऊ दिले नाही.

जगदंबिका पाल यांनी अत्यंत नम्रतेने विनंती केली की, विरोधकांनी आपापल्या जागांवर जावे. पण कोणीच ऐकले नाही, आणि अखेर पुन्हा सभागृह स्थगित करण्यात आले.संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू  यांनी सांगितले की, “पहिल्यांदा म्हणल्यावर चर्चा होईल.” मात्र आज ते ही शक्य झाले नाही.राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. ती मान्य झाली नाही. आता पावसाळी अधिवेशन टाळता येणार नाही, म्हणून अधिवेशन सुरू करण्यात आले आहे.

पंतप्रधान आज देशाला संबोधित करताना म्हणाले की, “आतंकवादी हल्ल्यावेळी अनेक राजकीय पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला.” मात्र त्यांनी काँग्रेसचे नाव घेतले नाही. राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांचे नेते त्या वेळी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी पाठिंबा दर्शवला होता.पंतप्रधानांचे भाषण हे विरोधकांबद्दल राजकीय टीका होती, त्यामुळे विरोधकांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही आणि सभागृहात गोंधळ सुरूच राहिला. जर सरकार चर्चेस तयार नसेल, तर विरोधक ‘काम रोको’ प्रस्ताव आणू शकतात. अशी मागणीही केली जात आहे.पंतप्रधान म्हणाले की, “लोकशाहीत कुणाचाही आवाज दाबला जाऊ नये.” पण त्यांच्या खासदारांनी विरोधकांचा आवाज दाबला, यावर त्यांनी काहीही भाष्य केले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!