अर्धापूर पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा डबल नियुक्तीचे आदेश

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात 28 मे 2025 रोजी जिल्हा स्तरीय पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर एक-एक पोलीस अंमलदाराची बदली परत करण्यात आली. काहींमध्ये विनंती सांगण्यात आले. तर काहींमध्ये कारणे वेगळी दाखवण्यात आली. असे एकूण 90 आदेश काढण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर 11 जुन रोजी अर्धापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार महिला अश्र्विनी गोडबोले बकल नंबर 2954 यांची पुन्हा अर्धापूर येथेच नेमणूक करण्यात आली. असाच दुसरा प्रकार एक समोर आला ज्यामध्ये सर्वसाधारण बदल्यांच्या आदेशानुसार अर्धापूर येथून भाग्यनगर येथे आलेले पोलीस अंमलदार संजय विश्र्वनाथ घोरपडे बकल नंबर 134 यांना पुन्हा एकदा अर्धापूर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे. घोरपडे यांच्या आदेशात बदलीचा संदर्भ 28 मे 2025 रोजीचा आस्थापना मंडळाचा निर्णय असे लिहिले आहे. या आदेशावर पोलीस स्टेशनमधील संख्याबळाचा सरासर विचार करून रिक्त पदे व निकड लक्षात घेता ही बदली करण्यात आल्याचे लिहिले आहे. हा आदेश 19 जून रोजी मेलवर पाठविण्यात आला.
काही खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक-एक आदेशांमध्ये पोलीस अंमलदार अश्र्विनी गोडबोले आणि संजय घोरपडे यांचाच समावेश नसून एकूण 90 पोलीस अंमलदारांच्या अशा आदेशांचे निर्गमन झाले आहे. ज्या पोलीस स्टेशनला बदली झाली किंवा जेथून बदली झाली अशाच पोलीस ठाण्यांच्या मेलवर हे एक-एक बदल्यांचे आदेश पाठविण्यात आले आहेत. यामध्ये एलसीबीमध्ये जाण्यासाठी इच्छूक असणाऱ्या पोलीस अंमलदारांना एलसीबी न देता त्यांनी पुर्वी केलेले पोलीस ठाणेच पुन्हा बहाल करण्यात आले आहे. बऱ्याच जागी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अंमलदारांचे मुळ घर आहे त्या ठिकाणी सुध्दा पोलीस अंमलदारांना नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्त्यांसाठी अनेक स्वियसहाय्यकांकडून आलेल्या संदेशांना महत्व दिले गेले असेही काही पोलीस सांगतात. अनेक पोलीस अंमलदारांनी त्यांच्याच मार्फत आपल्या बदल्या करून घेतल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!