इराण सोबत युद्ध करून इजरायलने एक चांगला धडा घेतला होता, पण तरीही त्यांनी विसरायला न येणारी चूक पुन्हा केली आहे. आता त्यांनी सीरियासोबत युद्ध सुरू केले आहे. सीरियामधील अनेक ठिकाणी इजरायलने बॉम्बहल्ले केले आहेत. यामागचे कारण ऐकल्यावर वाचकांनाही हसू येईल. इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, त्यांनी सीरियामधील अल्पसंख्याक ‘ड्रूज’ समुदायाचे रक्षण करण्यासाठी हे युद्ध सुरू केले आहे.

ड्रूज हा एक विशेष अल्पसंख्याक समुदाय असून तो प्रामुख्याने अरब समाजातील असून सीरिया, जॉर्डन आणि इजरायलच्या पर्वतीय भागात राहतो. या समुदायाचा धर्म इस्लामपासून अकराव्या शतकात वेगळा झाला आणि त्यांनी आपली स्वतंत्र धार्मिक ओळख तयार केली. हे लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात आणि आपला धर्म गोपनीय ठेवतात. त्यांच्या समाजात बाहेरच्यांशी लग्न करणे फारसे प्रचलित नाही.नेतान्याहू म्हणतात की, ड्रूज समुदायावर सीरियन सरकारकडून अत्याचार होत असल्यामुळे त्यांनी ही लष्करी कारवाई केली. परंतु अनेक तज्ज्ञ असे सांगतात की, हे केवळ एक निमित्त आहे. प्रत्यक्षात इजरायलला इराणची वाढती ताकद आणि सीरियात येणारी नवीन सत्ता याची भीती वाटते. सीरिया हे इस्लामिक राष्ट्र असून ते इराणसोबत जवळीक वाढवत आहे. इजरायलच्या दृष्टीने हे एक धोका आहे.

या हल्ल्यांदरम्यान सीरियाच्या राजधानीजवळ आणि दुसऱ्या काही शहरांमध्ये बॉम्बस्फोट झाले. काही पत्रकारांच्या कॅमेऱ्यात हे थेट प्रसारित झाले. सीरियाच्या सरकारने सीएनएनला सांगितले की या हल्ल्यांत ३ लोकांचा मृत्यू झाला आणि ३६ जण जखमी झाले आहेत.अमेरिकेने इस्रायलवर निर्बंध लादलेले असतानाही इजरायलचे हे हल्ले सुरूच आहेत. यावर बऱ्याच देशांनी टीका केली आहे. इजरायलने यावेळी रक्षा मंत्रालयासारख्या सरकारी इमारतींवर हल्ला केला आहे. अनेकांचे मत आहे की, हे हल्ले केवळ ड्रूज समुदायाच्या रक्षणासाठी नसून, आंतरराष्ट्रीय लक्ष आपल्याकडून दूर ठेवण्यासाठी, आणि देशांतर्गत विरोध दडपण्यासाठी आहेत.

नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांच्या विरोधात त्यांच्या देशात आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धजन्य वातावरण निर्माण करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते.इजरायलचा सीरियावरचा हल्ला हे एक स्पष्ट संकेत आहे की, त्यांना आपल्या सीमेवरील इराण समर्थित लढवय्यांची वाढती उपस्थिती आणि हिजबुल्ला सारख्या गटांची ताकद वाढू नये, अशी चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी सीरियातील दोन प्रमुख शहरांवर हल्ले केले आणि भविष्यात इराणवरही हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ही परिस्थिती प्रामुख्याने सामरिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय समीकरणांच्या दृष्टीने पाहिली गेली पाहिजे. या सर्व प्रकारामागे सत्तेचे, संरक्षणाचे आणि जागतिक राजकारणातील वर्चस्वाचे मोठे राजकारण आहे.

