नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या 18 वर्षीय युवकाला 24 तासात छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे.
दि.14 जुलै रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन बालिकेला कोणी तरी फुस लावून पळवून नेले आहे. त्या बालिकेचे वय 12 वर्ष आहे. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 270/2025 दाखल केला. हा गुन्हा अल्पवयीन बालिकेला पळवून नेण्याच्या सदरात आहे. मोबाईल लोकेशनच्या आधारे या प्रकरणाचा शोध पोलीसांनी लावला आणि त्या दोघांना 24 तासात ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्याचे नाव ओमकार मारोती पनपट्टे (18) रा.वसमत तालुका असे आहे.
ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष जोंधळे, पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव, विनोद साने, प्रदीप साखरे, पोलीस अंमलदार नितीन इंगळे, किशन चिंतोरे, विकास मांडवगडे, गोविंद भांगे, सोमनाथ पत्रे, गंगाधर भुसे यांनी पुर्ण केली.
विमानतळ पोलीसांनी अल्पवयीन बालिका 24 तासात शोधली
