हिंदू युवतीच्या प्राणासाठी मुस्लिम समाज रक्षणकर्ता बनला–धर्म नाही, माणुसकी जिंकली!  

सरकारने हात टेकले, मुस्लिम धर्मगुरूंनी हात पुढे केला – एका हिंदू युवतीसाठी ;ब्लड मनी नाही, ही आहे ब्लड ह्यूमॅनिटी

भारतामध्ये हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून प्रत्येक वेळी स्वतःला ‘हिंदुत्ववादी’ म्हणवणाऱ्या केंद्र सरकारने यमनमधील एका हिंदू युवतीच्या मृत्यूदंड प्रकरणात हात टेकले, आणि त्यानंतर केरळमधील एक ज्येष्ठ मुस्लिम धर्मगुरू पुढे आले. त्यांनी यमनमधील धर्मगुरूंशी संपर्क साधून त्या युवतीची होणारी फाशी थांबवण्यास यश मिळवले. एवढेच नव्हे, तर तिच्या सुटकेसाठी आवश्यक असलेली ‘ब्लड मनी’ म्हणजेच ११ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी सुरुवात सुद्धा मुस्लिम संघटनांनी केली आहे.

यावरून हे स्पष्ट होते की केंद्र सरकार भलेही मुस्लिम विरोधात दुर्भावनात्मक वागले असले, तरी मुस्लिम समाजाने मानवतेला सर्वोच्च मान देऊन त्याविरोधात एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. ही कृती त्यांचे मोठेपण दाखवते. हेच कार्य करणाऱ्या मुस्लिम संघटनांना आणि धर्मगुरूंना सलाम केला पाहिजे.आज ज्या व्यक्तींच्या नावाने द्वेष पसरवला जातो, देशद्रोही ठरवले जाते, त्याच व्यक्तींनी सरकारला अपयशी ठरवून मानवतेचे उदाहरण ठेवले आहे. आता तरी समाजाने समजून घ्यायला हवे की धर्मापेक्षा माणुसकी मोठी आहे.भारतीय मुस्लिम समाजाने हे सिद्ध केले की ते देशावर मनापासून प्रेम करतात. हिंदू-मुस्लिम वाद बाजूला ठेवून, एक हिंदू युवतीसाठी एकजुटीने काम करून, त्यांनी तीव्र धर्मवादाला ठाम उत्तर दिले आहे.

घटनेचा आढावा:

निमिषा प्रिया हिने केरळमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले होते. अधिक उत्पन्नाच्या उद्देशाने ती यमनमध्ये गेली आणि तिथे नोकरी करत असताना तिने एका मुस्लिम युवकाशी करार पद्धतीने लग्न केले. परंतु पुढे त्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. तिचा व्हिसा तिच्यापासून लपवून ठेवला गेला. सुटकेसाठी तिने त्याच्या चहात झोपेच्या गोळ्या टाकल्या. तिचा हेतू त्याला झोपवून भारतात परत येण्याचा होता, मात्र त्याचा मृत्यू झाला.2020 मध्ये तिला मृत्यूदंड देण्यात आलं होता.  शरीयत कायद्यानुसार तिला मृत्युदंडाची शिक्षा झाली. तिच्या कुटुंबीयांनी सरकारकडे मदतीची मागणी केली, मात्र केंद्र सरकारने सांगितले की ‘ब्लड मनी’ हा खाजगी तडजोडीचा भाग आहे.

यावेळी केरळचे ९४ वर्षीय मुस्लिम धर्मगुरू ग्रँड मुफ्ती कंठापुरम अबूबकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी यमनमधील धर्मगुरूंशी संपर्क केला. शरीयत कायद्यानुसार मृत्युदंड टाळण्यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची माफी आवश्यक असते. ग्रँड मुफ्तींनी त्यांना समजावले आणि ते तयार झाले. परिणामी, त्या युवतीची फाशी थांबवली गेली.या सर्व प्रकरणातून भारतातील मुस्लिम समाजाने एक सामाजिक, धार्मिक आणि मानवीदृष्ट्या भव्य कार्य करून दाखवले आहे. ‘Indian Association for the Release of Nimisha Priya’ या नावाने एक संघटना तयार झाली.  सामान्य माणूस,डॉक्टर, वकील, व्यावसायिक, आणि परदेशातील प्रवासी भारतीय यांनी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून ११ कोटी रुपये उभे करण्यासाठी मदतीचे आवाहन केले.

सारांश

या घटनेने भारतातील मुस्लिम समाजाविषयी पसरवले जाणारे अनेक गैरसमज फोल ठरवले आहेत. त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की ते धर्मापेक्षा मानवतेला मोठे मानतात. या घटनेतून संपूर्ण देशाला हे शिकायला हवे की बंधुत्व, सौहार्द आणि प्रेम हेच भारतीयत्वाचे खरे स्वरूप आहे.यामध्ये काही अपवाद असतीलही – जसे की राजस्थानमधील हत्येची उदाहरणं – पण अपवादामुळे संपूर्ण समाजाला दोष देणे अयोग्य आहे. हे उदाहरण देशासाठी एक ऐतिहासिक शिकवण आहे.

जय हिंद! जय भारत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!