नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात एका बॅंकेसमोरून डीकीत ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. तसेच हदगाव शहरातील मसाईगल्ली येथील एक घरफोडून चोरट्यांनी 50 हजार रुपयाचे दागिणे चोरले आहेत.
पोटा (बु) ता.हिमायतनगर येथील लक्ष्मण दत्ता सुर्यवंशी हे स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा भोकर येथून 3 लाख रुपये घेवून 8 जुलै रोजीच्या दुपारी 3.30 वाजता बाहेर आले. त्या तीन लाखांमधील एक लाख रुपये त्यांनी आपल्या खिशात ठेवले आणि उर्वरीत दोन लाख रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवून बॅंकेसमोर असणाऱ्या दुकानात रेनकोट घेण्यासाठी गेले. या वेळेत चेारट्यांनी त्यांच्या डिक्कीतील दोन लाख रुपये चोरून नेले आहेत. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 361/2025 नुसार दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक आवटे अधिक तपास करीत आहेत.
हदगाव येथील उमेश नरसींगराव तोष्णीवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जुलै रोजी दुपारी 3 ते 4.25 वाजेदरम्यान मसाईगल्ली हदगाव येथील त्यांचे घर फोडून चोरट्यांनी त्यातून 50 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. हदगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 224/2025 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
भोकर शहरातील दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये चोरले; हदगाव येथे घरफोडले
