नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी 11 जुलै रोजी हिंगोली -नांदेड रस्त्यावरील पार्डी टोल नाक्याजवळ एका सहा चाकी वाहनामध्ये रेडा वर्ग या जातीची 21 जनावरे पकडली आहेत. या प्रकरणात जनावरांची किंमत 20 लाख 71 हजार 900 रुपये आणि गाडीची किंमत 15 लाख रुपये असा एकूण 35 लाख 71 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि 5 उत्तर प्रदेशातील लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील आणि पोलीस उपअधिक्षक डॅनियल बॅन यांनी अर्धापूर पोलीसांचे कौतुक केले आहे.
पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर भाऊराव सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 जुलै रोजी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम आणि त्यांचे सहकारी गस्त करत असतांना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी पार्डी टोल नाक्याजवळ एक सहा चाकी गाडी आडवली. तिचा क्रमांक युपी 22 ए.टी.5187 असा आहे. या गाडीमध्ये 21 रेडा जातीची जनावरे भरलेली होती.
अर्धापूर पोलीसांनी याप्रकरणी उत्तर प्रदेश राज्यातील फरीद भुरा, मोहम्मद आक्रम इसार अहेमद, शमशाद रहेम इलाही, फुरखान अख्तर , रशिद मुजूराव मसुरी या पाच जणांना विरुध्द गुन्हा क्रमांक 402/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 ची कलमे जोडलेली आहेत. या 21 रेड्यांची किंमत 20 लाख 71 हजार 900 रुपये आणि गाडीची किंमत 15 लाख असा 35 लाख 71 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अर्धापूर पोलीसांनी 20 लाख 72 हजारांचे 21 रेडे पकडले
