डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न

नांदेड  :- श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था,नांदेड येथे 6 जुलै रोजी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या चित्रकला व निबंध स्पर्धेत ५० युवक, युवतीनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक सागर दिलीप कांबळे, द्वितीय क्रमांक विनायक शरद मोरे तर तृतीये क्रमांक महेश मुडकर यांनी मिळविला. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवकांता माधव पांचाळ द्वितीय क्रमांक सुप्रिया कोल्हे तृतीय क्रमांक मोनिका भगवान एडके यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सहभाग घेतलेल्यांना उतेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी नंदू कुलकर्णी यांनी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनातील बालपणापासून ते त्यांच्या बलिदानापर्येंत सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंदा रावलकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुभाष गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमाला नंदू कुलकर्णी, सौ. दासवाड के. टी. सुभाष गोडबोले , खंडागळे डी. के. , राऊत पी. बी. यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!