नांदेड(प्रतिनिधी)-आज मध्यरात्री 3 वाजेच्यासुमारास ग्लोबल हॉस्पीटल जवळ असलेल्या एका मोकळ्या जागेचा कब्जा दुसऱ्यांनीच मारला. रात्री 3 वाजता महिला पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गेली असतांना पोलीस अंमलदाराने पोलीस निरिक्षकांना विचारले तेंव्हा ते प्रकरण सीव्हील आहे. म्हणून कोणी तेथे जाऊ नका असे सांगितले. यावरुन पोलीस निरिक्षकांना माहितच होते असे दिसते. सीव्हील प्रकरण रात्रीच का अंमलात आणले जाते. हा मोठा एक विषय यानिमित्ताने समोर आला आहे. या जागेवर पत्रे ठोकून त्यावर जागा मालक व कब्जेदार हे सुध्दा लिहुन ठेवण्यात आले आहे. आश्चर्य आहे ना सर्वच काही रातोरात झाले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार रात्री 3 वाजता एका मोकळ्या जागेवर असलेले तारफेन्सींग तोडून काही जणांनी तेथे लोखंडी पिलर रोवले आणि आतील बाजूस एक झोपडी वजा इमारत तयार केली आणि समोर दोन पत्रे मारले. त्या पत्र्यावर जागा मालक व कब्जेदार असे लिहिले असून मे.विसावा हॉस्पीटॅलीटी, पीआर कार्ड नंबर 6368, सर्व्हे नंबर 61-ब , मनपा मालमत्ता क्रमांक 1171403/1 असे लिहिले आहे. सोबतच मोबाईल क्रमांक 9923888823 आणि 8408841776 हे पण लिहिले आहे.
काल दि.9 जुलैचा सुर्यास्त होईपर्यंत या ठिकाणी पत्रे नव्हे. त्या ठिकाणी फक्त तारफेन्सींग होते आणि तेथे मालकाचे नाव दुसरेच होते. या ठिकाणी रात्री 3 वाजता काही युवक तेथे एका ट्रॅक्टरमधून पत्रे खाली उतरतांना दिसत आहेत. त्या ठिकाणी पोलीस गाडीपण आहे. रात्री एक महिला 3.30 वाजता पीसीओ शिवाजीनगर यांच्याकडे गेली आणि माझ्या संपत्तीवर काही गुंड लोक कब्जा करत आहेत मला मदत करत आहेत मला मदत करा अशी मागणी केली. रात्रीच्या मार्शलने ही घटना पोलीस निरिक्षकांन सांगितली. तेंव्हा कोणी ही तेथे जायचे नाही ते सीव्हील मॅटर आहे असे पोलीस निरिक्षकांनी सांगितले. पण तेथे पोलीस गाडी उभी आहे आणि पोलीस पण उभे आहेत आणि त्यांच्या उपस्थितीतच हे नवीन पत्रे लावण्यात आले आहेत.
या घटनेवरून प्रश्न असा उपस्थित होतो की, पीआर कार्ड क्रमांक रात्रीच कसा उपलब्ध झाला. मनपाचा मालमत्ता क्रमांकही रात्रीच कसा उपलब्ध झाला. असे या घटनेवरून दिसते आणि हे खरे नसेल तर हे अत्यंत सुनियोजितपणे रचलेलेले खलबत आहे. कोण याला मदत करत आहे, कोण मदतीचा मध्यस्थ आहे आणि कोणाच्या आशिर्वादाने, कोणाला मोदकाचा प्रसाद दिल्यानंतर हे सर्व घडले आहे याचा शोध मात्र घेईल कोण? कारण शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक हे मॅटर सीव्हील आहे, असे सांगत आहेत. फक्त शिवाजीनगर पोलीस निरिक्षकच असे सांगतात असे नाही बरेच छोटे आणि मोठे पोलीस अधिकारी अशा प्रकारांना सीव्हील मॅटर म्हणून झटकतात हे अनेकदा पाहण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत तर रियलइस्टेटचा एक कारभार सुध्दा सुरू आहे. म्हणजे जिसकी लाठी उसकी भैस असाच प्रकार सुरू आहे असे लिहिले तर चुकीचे काय? आणि पोलीस खाते करील ते होईल ही म्हण सुध्दा काही आम्ही बनवलेली नाही ती अनेक वर्षापासून प्रचलित म्हण आहे.
रात्री 3 वाजेच्यासुमारास घडलेल्या घटनेचा प्राप्त व्हिडीओ….
सीव्हील मॅटरच्या नावाखाली रात्री 3 वाजता जागेचा ताबा बदलला
