ग्राम पंचायत सदस्य शोभा नवनाथ काकडे यांचे निलंबन रद्द

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नसरतपुर-हस्सापूर-नवीन हस्सापूर या ग्राम पंचायतीतील सरपंच देविदास विठ्ठलराव सरोदे, उपसरपंच मारोती जळबा काकडे आणि सदस्या शोभा नवनाथ काकडे यांना त्यांच्या पदावरून हटविले होते. त्यांनी ग्राम पंचायतने बनविलेल्या गाळ्यांचा गैरवापर केला असा आरोप ग्राम पंचायत सदस्य गोविंदराव किशनराव सोनटक्के यांनी केला होता. परंतू अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयसिंह देशमुख यांनी या प्रकरणातून शोभा नवनाथ काकडे यांच्याविरुध्द काही दोषसिध्दी होत नाही म्हणून त्यांना पुन्हा सदस्यपद बहाल केले आहे. तसेच पण सरपंच देविदास विठ्ठलराव सरोदे यांचे निलंबन कायम ठेवले आहे. या प्रकरणातील उपसरपंच मारोती जळबा काकडे यांचे निधन झाल्याने त्यांच्याविरुध्दचा काहीच निर्णय आला नाही.
नसरतपुर-हस्सापूर-नवीन हस्सापूर या ग्राम पंचायतीचे सदस्य गोविंदराव सोनटक्के यांनी केलेल्या तक्रारीनुसार ग्राम पंचायतने तयार केलेल्या पाच दुकांनामध्ये शोभा नवनाथ काकडे या गॅस सिलेंडर ठेवून त्याच्या गैरवापर करत आहेत. मुळात ग्राम पंचायतने बनविलेले गाळे हे किरायने देवून त्यातून उत्पन्न मिळवायचे असते. त्याची संपूर्ण जबाबदारी गटविकास अधिकारी यांच्या अधिनिस्त काम करणारे ग्राम विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांची असते. या प्रकरणावर 3 फेबु्रवारी 2025 रोजी माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी देविदास विठ्ठलराव सरोदे, मारोती जळबा काकडे आणि शोभा नवनाथ काकडे यांचे सदस्यत्व रद्द केले होते.
या प्रकरणी तिघांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर विजयसिंह देशमुख यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. त्या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी शोभा नवनाथ काकडे यांनी ग्राम पंचायतच्या जागेवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही, त्याचा पुरावा उपलब्ध नाही.म्हणून शोभा नवनाथ काकडे यांना आपल्या ग्राम पंचायत सदस्य पदावर कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. या बद्दल शोभा नवनाथ काकडे म्हणाल्या सत्य आणि न्यायाचा विजय झाला आहे आणि न्याय मिळाल्याचा मला अभिमान आहे. या प्रकरणात सरपंच देविदास सरोदे यांचे निलंबन मात्र कायम राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!