नांदेड,(प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कापसी ते गोळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी चोरटी वाळू भरलेला एक टिप्पर पकडला आहे. त्यात एकूण चार लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार आप्पाराव दशरथ वरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ते आणि त्यांचे सहकारी पोलिसांना कापशी ते गोळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर गस्त करत असताना, त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार या रस्त्यावर असलेल्या कॅनॉल मधून चोरटी रेती वाळू काढून वाहतूक होत आहे. तेथे जाऊन तपासणी केली असता तेथे एम एस 26 एच 7218 क्रमांकाचा एक टिप्पर सापडला.त्यात असलेल्या वाळू संदर्भाने विचारणा केली असता, कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही म्हणून उस्मान नगर पोलिसांनी संभाजी आत्माराम जाधव (30) टिप्पर चालक आणि ज्ञानेश्वर प्रकाश जाधव (35) दोघे राहणार चिंचोली तालुका लोहा यांच्याविरुद्ध गुन्हा: क्रमांक 120/2025 दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर गाडेकर, पोलीस अंमलदार सुशील कुबडे, नामदेव रेजितवाड, आप्पाराव वरपडे, पवार, कांबळे यांनी ही कार्यवाही केली. कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी या कार्यवाहीसाठी उस्मान नगर पोलिसांचे कौतुक केले आहे.
More Related Articles
किनवट येथे चोरट्यांनी चार दुकाने फोडली
नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे चार दुकाने फोडून चोरट्यांनी 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्याचा प्रकार…
बळेगाव शाळेच्या विद्यार्थाचा अपघात; एक ठार,दोन गंभीर जखमी
हरीण ऍटो ड्रायव्हरच्या कॅबीनमध्ये घुसल्याने घडली घटना उमरी(प्रतिनिधी)- उमरी तालुक्यातील मौजे हातणी येथिल एकाच गावचे…
इतवारा पोलिसांनी 11 गोवंश पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी काल रात्री दोन ठिकाणी एकूण 11 गोवंश जातीची जनावरे पकडली आहेत. या गोवंशांची…
