पैसे देण्या-घेण्यावरुन खून करणाऱ्या तिघांना दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कामनगाव ता.भोकर येथे पैसे देणे-घेण्याच्या वादातून तीन जणांनी एका व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे.
सविता पांडूरंग सोळंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जून रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास मौजे कामनगाव येथे त्यांचे पती पांडूरंग बालाजी सोळंके यांना गणेश मोहन वाघमारे, आनंद देगलूरकर आणि विजय मोहन वाघमारे या दोन्ही भावांनी पैसे देण्या-घेण्याच्या वादातून भांडण करत त्यांना मारहाण केली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमंाक 293/2025 नुसार दाखल केली असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शैलेंद्र औटे यांच्याकडे देण्यात आला आहे. भोकर न्यायालयाने पकडलेल्या तिघांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!