चोरीचा गुन्हा इतवारा पोलीसांनी 6 तासात उघडकीस आणला

चोरी गेलेला 100 टक्के ऐवज जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-एका घरातून सोन्याचा नेकलेस, कानातील सोन्याचे झुमके असा 1 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला इतवारा पोलीसांनी 24 तासात गजाआड केले आहे.
इस्लामपूरा येथील मोहम्मद मुद्दसर अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जून रोजी रात्री ते आणि त्यांची पत्नी ऍटो रिक्षातून प्रवास करत असतांना पत्नीच्या पर्समधून कोणी तरी सोन्याचा नेकलेस, 48 हजार रुपयांचा आणि सोन्याचे झुमके 96 हजार रुपयांचे आणि 21 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. या संदर्भाने इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 194/2025 दाखल झाला. पोलीस निरिक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार मोहन हाके, लक्ष्मण दासरवाड, धिरज कोमुलवार, नजरेआजम देशमुख, रेवणनाथ कोळनुरे, शेख इजराईल यांनी वेगवेगळ्या पध्दतीचा अवलंब करून जफर खान अहेमद खान (32) वर्ष रा.एकबालनगर देगलूर नाका नांदेड त्याच्याकडून त्याने चोरलेला 100 टक्के ऐवज जप्त केला आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी इतवारा पोलीसांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!