नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारात ठेवलेल्या 24 बॅटऱ्या 70 हजार रुपये किंमतीच्या चोरीला गेल्या आहेत.
मुकेश महेंद्र पळशीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 जूनच्या सायंकाळी 5 ते 6 जूनच्या सकाळी 11 वाजेदरम्यान लोहा रस्त्यावरील पार्डी शिवारात बीएसएनएल कार्यालयाच्या आवारात 24 बॅटऱ्या ठेवलेल्या होत्या. त्या कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. लोहा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 166/2025 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
पार्डी शिवारातील बीएसएनएल कार्यालयात चोरी
