नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन घोरपडींना कत्तलीपासून वाचवून वन्य प्राण्यांचा आशिर्वाद प्राप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 1 वाजेच्यासुमारास त्यांनी आपल्या गुप्त माहितीच्या आधारे चंदासिंग कॉर्नरजवळ एक पिशवी घेवून फिरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्या पिशवीमध्ये पाच किलो आणि तिन किलो अशी वजने असलेल्या दोन घोरपड्डी सापडल्या. या घोरपड्डी तो व्यक्ती विक्री करण्यासाठी आणल्या होत्या. गोरपड्डींची कत्तल करून, त्यांच्या मनक्यांच्या हाडांचे सुप बनवून ते पिल्यामुळे हाडे मजबुत होतात असे जुने लोक सांगत होते. पण ते आता वन्य प्राणी आहेत आणि वन्य प्राण्यांची तस्करी करणे आणि त्यांची कत्तल करणे हा प्रकार सुध्दा गुन्ह्याच्या स्वरुपाचा आहे. या घोरपड्डींची किंमत 16 हजार रुपये सांगण्यात आली आहे. अशा प्रकारे घोरपड्डींची कत्तल थांबवून वन्य प्राण्यांचे आशिर्वाद प्राप्त करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी कौतुक केले आहे. या प्रकरणाची तक्रार पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी स्वत: दिली आहे. या प्रकरणात घोरपड्डींची तस्करी करणारा दशरथ यलप्पा धोतरे (27) रा.काकांडी ता.जि.नांदेड हा व्यक्ती आहे. या प्रसंगी पोलीस अंमलदार वसंत केंद्रे, आसिफ, कांबळे आणि जमीर यांनी दशरथ धोतरेला पकडण्यात मेहनत घेतली.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन घोरपड्डींची कत्तल वाचवली
