नांदेड(प्रतिनिधी)-रहिमपूर, दुध डेअरीजवळ उघडे असलेल्या घरातून चोरट्यांनी 1 लाख 71 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
शेख मौला शेख मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जून रोजी सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 2.30 वाजेदरम्यान अनावधानाने त्यांनी घराच्या दरवाज्याला कुलूप लावलेले नव्हते. या संधीत चोरट्यांनी त्यांच्या घरातील गादीखाली ठेवलेले 14 ग्रॅम सोन्याचे गलसर 98 हजार रुपयांचे, 7 ग्रॅम सोन्याचे गंठन 49 हजार रुपयांचे आणि साडे तीन ग्रॅमचे मनीमंगळसुत्र 24 हजार 500 रुपयांचे असा एकूण 1 लाख 71 हजार 500 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 552/2025 नुसार नोंदवली असून पोलीस उपनिरिक्षक भिसे अधिक तपास करीत आहेत.
रहिमपूरमध्ये 1 लाख 71 हजार 500 रुपयांची चोरी
