नांदेड –डॉ. आंबेडकर नगर नांदेड येथील ज्येष्ठ उपासक व अमर भीम कुस्ती दंगलचे अध्यक्ष, महात्मा फुले समता परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते मुरहारी इरबाजी तारू वय 70 वर्ष यांचे काल रात्री दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 9 जून 2025 रोज सोमवारी दुपारी 3 वाजता त्यांचे राहते घर येथून निघून शांतीधाम गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जुन्या पिढीतील आंबेडकरी नेते स्मृतीशेष माणिकराव आमदुरेकर यांचे ते नातू होत.
