नांदेड(प्रतिनिधी)-शेळ्या सोडल्याच्या कारणातून मुलानेच आपल्या बापाचा दगडाने दुखापत करून खून केल्याचा प्रकार वरदडा तांडा ता.मुदखेड येथे 6-7 जून रात्री कधी तरी घडला आहे.
परसराम रामजी पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जूनच्या सायंकाळी 5 ते 7 जूनच्या सकाळी 7 वाजेदरम्यान गोविंद सावडा जाधव (75) यांना शेळ्या चारण्यासाठी सोडून नेत असतांना शेळ्या का सोडल्या या कारणावरून त्यांचा मुलगा संतोष गोविंद जाधव याने दगड उचलून त्यांच्या चाळ्यावर मारला आणि जखमी अवस्थेत त्याच जागी पडून त्यांचा मृत्यू झाला. मुदखेड पोलीसांनी या घटनेला गुन्हा क्रमांक 100/2025 नुसार दाखल केले असून पोलीस उपनिरिक्षक एस.एस.शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.
पुत्राने पित्याचा खून केला
