तरोडा (बु)मध्ये 4 लाख 67 हजारांची चोरी; रेल्वे स्थानक ते बसस्थानक रस्त्यावर सासु आणि सुनेला लुटले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील तरोडा (बु) मध्ये एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 67 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. रेल्वे स्थानक ते बसस्थानक या रस्त्यावर सासु आणि सून जात असतांना दोन चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिणे आणि दोन मोबाईल असा 1 लाख 40 हजारांचा ऐवज बळजबरीने हिसकावला आहे.
बालाजी विश्र्वनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जूनच्या सायंकाळी 6 ते 7 जूनच्या सकाळी 9 वाजेदरम्यान तरोडा (बु) मधील बर्डे हॉस्पीटलच्या शेजारी त्यांचे बंद घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 67 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 323/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक वाडेवाले अधिक तपास करीत आहेत.
हिंगोली येथील सुर्यश्री विशाल काटमवार या महिला 7 जुनच्या सायंकाळी 5.15 ते 5.30 वाजेदरम्यान रेल्वे स्थानक ते बसस्थानक रस्त्यावरून चालत बसस्थानकाकडे जात असतांना 20 ते 25 वयोगटातील दोन जणांनी येवून त्यांच्या आणि त्यांच्या सासुच्या पर्समधील ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 246/2025 नुसार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक लोंढे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!