अकोला येथून निघालेला निखील घरी पोहचलाच नाही

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडकडे जातो असे सांगून निखील आरुण तायडे हा दि.5 जून रोज गुरूवारी अकोल्यावरून नांदेडला निघाला. नांदेड येथे उशीरा पोहचल्यानंतर त्याने वडीलांना फोन करून सांगितले की, मी नांदेडला पोहचलो. पण रात्री उशीरा पोहचल्यामुळे त्यांनी लॉजवर मुक्काम करून सकाळी जातो असे सांगितला होता. अचानक फोन खराब झाला असे सांगून अद्याप पर्यंत तरी तो घरी परत आला नसल्याने वजिराबाद पोलीस ठाण्यात अरुण केशव तायडे (70) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारदार अरुण केशव तायडे रा.देशमुख कॉलनी अकोला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मला दोन मुले आहेत. एक सत्यजित आणि दुसरा निखील सत्यजित हा नागपूर येथे बॅंकेत नोकरीस असून दुसरा मुलगा निखील हा एमआर म्हणून काम करतो. तो दि.5 जून रोजी गुरूवारी अकोला येथून नांदेड येथे जाण्यासाठी दुपारी 2.30 वाजेच्या रेल्वेने नांदेडकडे निघला. रात्री 8 वाजेच्यासुमारास नांदेड रेल्वे स्थानकावर पोहचला. त्यांनी त्याच्या मोबाईलवरून फोन करून सांगितले की, मी नांदेडला पोाहचला. जेवन करून स्टेशनवर झोपतो असे सांगितले. त्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 जून रोजी 5.40 वाजता दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून सांगितले की, माझा मोबाईल खराब झाला आहे. तो दुरूस्त टाकतो अन्‌ फोन करतो तुम्ही परेशान होवू नका. त्यावरून मी त्यास विचारले की, तु आता कोठून बोलत आहेस त्यावर त्याने सांगितले की, मी सपना लॉज नांदेड येथून काम करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून बोलत आहे असे म्हणून त्याने फोन ठेवला. त्यानंतर 6.15 वाजता दुसऱ्या मोबाईलवरून माझी पत्नी अनिता हिच्या मोबाईलवर त्याने संपर्क साधला. माझा मोबाईल खराब झाला आहे. दुरूस्त झाल्यानंतर फोन करतो, बाबांनाही असे सांगितले आहे म्हणून त्याने फोन ठेवला. अद्यापही त्याचा संपर्क झाला नसून आम्ही नातेवाईकांकडेही चौकशी केली पण अद्यापही त्याचा संपर्क झाल्या नसल्यामुळे आज दि.7 जून रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार देत आहोत.
निखीलचे वर्णन: रंग निमगोरा, उंची 5 फुट 5 इंच, केस काळे मध्यम, वय 35, अंगात पांढरा शर्ट काळा पॅन्ट, पायात चपल, बोली भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, दाढी वाढवलेली आहे. याबाबतचा तपास वजिराबाद येथील पोलीस अंमलदार एस.जी. सोनटक्के हे करीत आहेत. तरी अशा वर्णनाचा व्यक्ती कोणास दिसल्यास पोलीस अंमलदार एस.जी. सोनटक्के यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा मोबाईल क्रमांक 8805007511 असे आवाहन वजिराबाद पोलीसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!