उमरीमध्ये जबरी चोरी; रेल्वे तिकिट निरिक्षकाचे घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-उमरीमध्ये एका दुकानात घुसून दारु पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे दिले नाही म्हणून अनेक साहित्यांचे नुकसान व तोडफोड करून 18 हजार रुपये बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. त्रिमुर्ती पार्क वाडी (बु) येथे एका घरात प्रवेश करून चोरट्यांनी 2 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
उमरी येथील व्यवसायीक राजेश पारसमल दर्डा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जून रोजी दुपारी 2.30 वाजेच्यासुमारास मारोती उर्फ वागले विठ्ठलराव शिंदे आणि अतुल कैलास आचकुलवार हे दोघे दुचाकीवर बसून आले आणि दुकानात येवून म्हणाले की, दारु पिण्यासाठी पैसे दे. दर्डा यांनी नकार दिल्यानंतर फर्शीचा तुकडा हातात घेवून कॉन्टर, खुर्च्या, पंख्यावर मारून तोडफोड केली आणि दर्डाच्या हाता पायावर सुध्दा फर्शीचे तुकडे मारले आणि त्यांच्या कॅश काऊंटरमधील 18 हजार रुपये बळजबरीने चोरून नेले आहेत. उमरी पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 179/2025 नुसार दाखल केली आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक आरमाळ हे करीत आहेत.
सचिन दिगंबर राणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्रिमुर्ती पार्क वाडी (बु) येथे त्यांची 12 क्रमंाकाची सदनिका आहे. दि.5 जून रोजी मध्यरात्री 12.30 ते 4 वाजेदरम्यान घरातील सर्व जण झोपलेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी गॅलरीमधून प्रवेश करून हॉलच्या खिडकीची स्लाईड काढून आत प्रवेश केला आणि कपाटातील रोख रक्कम 20 हजार आणि सोन्या-चांदीचे दागिणे 2 लाख 11 हजार रुपयांचे चोरून नेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 321/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक देशमुख अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!