नांदेड – रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनापती आनंदराज आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन सेनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले . नेत्ररोग रुग्णांची तपासणी करून 70 रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले तर 14 रुग्णांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याचवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फळांचेही वाटप करण्यात आले.

आंबेडकरवादी चळवळीतील महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आणि आशा म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे दरवर्षी त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याची परंपरा याही वर्षी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी पुढे चालू ठेवली आहे. प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून डॉ.आंबेडकर नगर येथील त्रिरत्न बुद्ध विहार परिसरात नेत्र रोग रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी 70 रुग्णांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले . 14 रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. याशिवाय आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद दिला . याचवेळी फळ वाटपाचा कार्यक्रमही घेण्यात आला. लायन्स नेत्रालय जंगमवाडी येथील नेत्ररोग तज्ञ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे येथे मोठे सहकार्य मिळाले .

या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्यासह कंथक सूर्यतळ राहुल चिखलीकर , प्रतीक मोरे , विलास असले आदींची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपेश सोनसळे, संमीनदर वाघमारे, अमर जोंधळे, संकेत सोनकांबळे, बंटी पांगरेकर, देवानंद सोनसळे, विक्रांत पोटफोडे आदिनी परिश्रम घेतले घेतले. यावेळी महिला व जेष्ठ नागरिकांची विशेष उपस्थिती होती.
