नांदेड(प्रतिनिधी)-लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो लोकसेवक अर्थात पोलीस उपनिरिक्षक आयुब कुरेेशी शेख हा माजी हत्या करतो अशी चर्चा करत आहे. म्हणून लाच मागणीच्या गुन्ह्यातील तक्रारदाराने तसा अर्ज दिला आहे. तसेच त्याच्यावर पोलीस उपनिरिक्षक आणत असलेल्या दबावामुळे तो नांदेड जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर निघून गेला आहे.
एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीस उपअधिक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरिक्षक आयुब कुरेशी शेख आणि त्याचा सहकारी खाजगी मित्र राजू भिसे पाटील या दोघांविरुध्द इतवारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 7, (अ), 61(2), 62 प्रमाणे गुन्हा क्रमांक 180/2025 दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच ही माहिती या प्रकरणातील लाच मागणीचा आरोपी आयुब कुरेशी शेख या पोलीस उपनिरिक्षकाला माहित झाली तेंव्हा या प्रकरणातील तक्रारदाराने त्या संदर्भाचा अर्ज पोलीस ठाणे अर्धापूर येथे दिला आहे. खरे तर हा लाच मागणीचा प्रकार प्रत्यक्ष लाच स्विकारतांना अटक होण्यासारखा होता. त्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन दिवस सापळा रचला होता. परंतू सापळा कार्यवाहीची चाहुल लागल्यामुळे पोलीस उपनिरिक्षक आयुब कुरेशी शेखने पैसे स्विकारले नाही. त्यानंतर लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला. सध्या ते फरार आहेत. परंतू या प्रकरणातील तक्रारदार सांगत होते की, ते नांदेडमध्येच फिरत आहेत आणि माझ्यावर अनेकांच्या माध्यमातून दबाव आणून मी अर्ज परत घ्यावा यासाठी सांगितले जात आहे. तसेच तो लोकसेवक अर्थातच गुन्हा क्रमांक 180 मधील आरोपी पोलीस उपनिरिक्षक आयुब कुरेशी शेख हा माझी हत्या करतो अशी चर्चा शहरात करत आहे. संबंधीत पोलीस अधिकारी आणि अनेक भ्रष्टाचारी व्यक्ती मला जीवे मारण्याची दाट शक्यता आहे. माझ्याविरुध्द कोणत्याही पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करू शकतात अशी मला शक्यता वाटते. म्हणून मला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावी अशी मागणी गुन्हा क्रमांक 180 च्या फिर्यादीने पोलीस ठाणे अधापूर यांच्याकडे केली आहे. या फिर्यादीसोबत दुरध्वनीवर संपर्क साधला तेंव्हा त्यांनी सांगितले की, माझ्यावर आणल्या जात असलेल्या दबावामुळे मी माझ्या आजीच्या घरी मध्यप्रदेशात आलो आहे. या संदर्भाने ते सांगतात की, मला भिती वाटत होती.
अर्धापूर पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ गायब
गुन्हा क्रमांक 180 च्या तक्रारदाराने दिलेली तक्रार 23 मे 2025 रोजीची आहे. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दि.24 मे रोजी लाच मागणीची पडताळणी झाली. तसेच 26 आणि 28 मे रोजी सापळा रचण्यात आला. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपले चार चाकी वाहन अर्धापूर येथील बस स्थानकात उभे केले होते. हे चार चाकी वाहन ओळखणाऱ्या अर्धापूर येथील बहुसंख्य पोलीसांनी सुट्या टाकून गायब झाले होते. म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचा हा खौफ आहे. तरी पण पोलीस लाच मागतच असतात, घेतच असतात आणि देणारे देतच असतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. तरीपण भ्रष्टाचाराचा धंदा बिनदिक्कत चालूच राहतो. त्याला काही जनतेतील एजंट सुध्दा सहकारी असतात.
लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकाच्या धमकीला भिऊन फिर्यादी गायब
