नांदेड(प्रतिनिधी)-वसमत फाटा ते गिरगाव मालेगाव रस्त्यावर मेंढला गावच्या अलीकडे पती-पत्नीला पोलीस असल्याची बतावणी करून दोन जणांनी एक लाख रुपयांचा ऐवज गंडवला आहे.
उत्तम नामदेव खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जून रोजी दुपारी 3.30 वाजता ते आणि त्यांची पत्नी दुचाकीवरुन वसमतफाटा ते गिरगाव मालेगाव इकडे जात असतांना मेंढला गावाच्या अलीकडे ता.अर्धापूर येथे दोन जणांनी आम्ही पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याकडील सोन्याची अंगठी, सोन्याची एकदानी, सोन्याची पोत असा एक लाख रुपयांचा ऐवज गंडवून टाकला. तसेच उत्तम खंदारे यांच्या गाडीला लाथ मारुन ते दोन्ही तथाकथीत पोलीस पळून गेले. अर्धापूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 324/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार गोणारकर अधिक तपास करीत आहेत.
बनावट पोलिसांनी पती-पत्नीला 1 लाखाला गंडवले
