“खोट्याला खोटं बोलणं अपराध आहे का?”महाराष्ट्र पोलिसांनी अभिसार शर्माला पाठवली नोटीस

गोदी मीडियाने जी खोट्या बातम्या दाखवल्या, त्या खोट्या बातम्या खोट्या आहेत, असं म्हणणं देशद्रोह आहे का? पण महाराष्ट्र पोलीस असंच मानतात. म्हणूनच त्यांनी अभिसार शर्माला नोटीस पाठवली.

अभिसार शर्माच्या एका ट्वीटविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी सोशल मीडिया एक्स हँडलला एक नोटीस पाठवली आहे. वाचकांना वाटत असेल की,अभीसार शर्मानी असं काय केलं की महाराष्ट्र पोलिसांना त्यात दखल घ्यावी लागली आणि एक्स ‘हॅण्डल’ला नोटीस पाठवावी लागली?”

असं त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे – “गोदी मिडिया खतरनाक आहे. देश हिताविरुद्ध काम करत आहे. रात्रभर खोट्या बातम्या चालून, भारतीय सेनेने उत्तर भारतात पाकिस्तानी हल्ल्यांना सफलतापूर्वक परतवून लावले.”परंतु, मोदी मीडियामध्ये दिसणाऱ्या बातम्या खोट्या आहेत. अभिसार शर्माने दाखवलेल्या चार बातम्या म्हणजे:

 

पाकिस्तान में घुसी भारतीय सेना,

जम्मू एअरपोर्ट से उडे भारत के फायटर प्लेन,

पाकिस्तान की राजधानी इस्लामाबाद पर कब्जा,

इंडिया हिट्स कराची सीन्स 1971.

यातील “जम्मू-कश्मीरहून उडाले भारतीय विमान” ही बातमी तर देशाच्या सुरक्षेविरोधात आहे. म्हणजेच ती सैन्याच्या ऑपरेशन विरुद्ध आहे सैन्याचे गुप्त नियोजन उघड करत आहे. म्हणजे ती वृत्तवाहिनी पाकिस्तानला दाखवत होती की, “जम्मू येथून आमची चार विमाने हवेत उडाली आहेत. अर्थात ते तुमच्यावर हल्ला करतील.”

“भारतीय सैन्याने उत्तर भारतात पाकिस्तानी हल्ल्याला मोठ्या उत्कृष्टतेने परतवून लावले” – या माझ्या शब्दांमध्ये महाराष्ट्र पोलिसांना काय दोष दिसतो?

अभिसार शर्माला समजून घ्यायचे आहे की, “महाराष्ट्र पोलिसांनी सोशल मीडिया एक्स ला त्यांच्या विरोधात का नोटीस पाठवली?” काय समस्या आहे?

 

त्यांच्या म्हणण्यानुसार, “मला स्पेसिअल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिसांच्या कार्यालयातून एक पत्र आले आहे. त्यात सांगितले आहे की, तुमच्या ट्वीटमध्ये पारदर्शकता असावी म्हणून ते ट्वीट रद्द करावे.” पोलीस सांगतात की, “तुम्ही IT कायदा 2000 चे उल्लंघन केले आहे.”

मोदी मीडियाच्या खोट्या बातम्यांना अश्विनी वैष्णव या केंद्रीय मंत्र्यांनी धन्यवाद दिले होते आणि सैन्यासोबत उभं राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.

 

अभिसार शर्मा विचारतात, “तुम्ही अशा खोट्या बातम्यांच्या कामाला गौरव का करत आहात?”

 

अभिसार शर्मा महाराष्ट्र पोलिसांना विचारतात, “आपल्याला वाटते काय की आम्ही सरकारचे बँड मास्टर व्हावे?” ते सांगतात, “माझं कामच आहे की, देशाविरुद्ध काही चालत असेल, तर ते देशाच्या जनतेसमोर मांडावे.”

 

जर कोणी देशाची बदनामी करत असेल, तर त्याला देशासमोर आणणे माझी जबाबदारी आहे.

 

ट्विटरला पाठवलेल्या नोटीसीचा अभिसार शर्माने विरोध केलाच आहे. त्यांच्यासोबत रवीश कुमार, अजितअंजुम, अशोक कुमार पांडे हे सुद्धा अभिसार शर्माची पाठीशी उभे आहेत.गोदी मीडियाच्या ‘आज तक’ चॅनलने एकदा माफी मागितली होती. त्यांनी सैन्याच्या ऑपरेशन डिटेल्स लीक केल्या होत्या, जे सूचना मंत्रालयाच्या नियमावलीच्या विरोधात आहे.

 

“मोदी मीडियाच्या खोट्या बातम्यांना एक्सपोज करणे राष्ट्रहितविरोधी आहे का? गोदी मीडियाने जगभरात देशाची बदनामी केली. त्यांच्यावर चर्चा करण्यात काय चुकीचं आहे? गोदी मीडिया दररोज देशाचं नाक कापत आहे.”

 

“आमचे ५७ खासदार ज्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये गेले, त्यामध्ये कोणताही राष्ट्राध्यक्ष समोर आला नाही. का नाही आला, याचा विचार कोण करेल?”

 

अभिसार शर्मा प्रश्न विचारतात:

“खोट्याला खोटं बोलणं चुकीचं आहे का?”

 

अशोक कुमार पांडे सांगतात, “नोटीस त्यांना पाठवली जात नाही ज्यांनी खोट्या बातम्या चालवल्या, पण त्यांना पाठवली जाते ज्यांनी खोट्याला खोटं म्हटलं.”

 

ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान खोट्या बातम्या ज्या वृत्तवाहिन्यांनी चालवल्या, त्यांना अभिसार शर्माने एक्स्पोज केलं, तर तो गुन्हा ठरतो आहे?

 

हे सर्व कल्पनेच्या विरोधात चाललं आहे. हे कसले रामराज्य आहे, ज्यामध्ये खोट्या बातम्यांना “खोटं” म्हणणं गुन्हा ठरतं आहे?

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एका सभेत म्हटलं होतं:

“खोटं बोला. वारंवार खोटं बोला. जे काही बोलता येईल ते सर्व खोटं बोला. जेथे बोलता येईल तेथे खोटं बोला. जेवढ्या वेळेस बोलता येईल, तेवढं खोटं बोला!”

 

अभिसार शर्मा वाचकांना प्रश्न विचारतात:

“मी अशा खोट्या बातम्यांना एक्सप्रेस करून आपल्यासमोर मांडल्या. आणि त्या बातम्या जर पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दाखवल्या असत्या, तर आपल्यापैकी बरेच जण मला देशद्रोही म्हणाले असते.”

 

“पण भारतीय जनता पार्टीचा प्रवक्त शहजाद पूनावाला किंवा भाजपचे काही छोटे पदाधिकारी पाकिस्तानी पत्रकारांना मुलाखत देतात, त्यांच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. हा प्रश्न विचारला जाणार नाही का?”

 

ISI चे प्रमुख, लेफ्टनंट जनरल दुर्रानी, यांनी स्पाय क्रोनिकल्स नावाचं पुस्तक लिहिलं आहे, ज्यामध्ये ते म्हणतात:आयएसआय ला वाटते की

“भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीसाठी राहावेत, कारण त्यामुळे देशात वाद, वेगळेपणा आणि विष पसरवणं सुरु राहील.”मग, मोदींवर प्रश्न उपस्थित करावा का?आजची परिस्थिती अजब आहे. देशासाठी विचार करण्याची शक्ती भ्रमित झाली आहे.

महाराष्ट्र पोलिसांना अभिसार शर्मा विचारतात माझ्या विरुद्ध खोटं इनकम टॅक्स प्रकरण दाखल केलं आहे. ती केस अभिसार शर्माने जिंकली होती. 2016 पासून त्यांच्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. इडीनेही दोन दिवस चौकशी केली.

 

“माझा प्रत्येक पैशाचा हिशोब त्यांनी घेतला. एकदा माझा मुलगा शाळेत जात असताना, अँटी टेररिस्ट ग्रुपचे पोलीस आले आणि दोन दिवस माझी चौकशी सुरु ठेवली. तरीही मी आजही प्रश्न विचारतोच आहे.”

 

“आता पोलिसांकडे एकच पर्याय राहिलेला आहे – आणि तो अत्यंत खतरनाक आहे.”

अभिसार शर्मा सांगतात:”माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत, मी माझं मत समाजासमोर – भारतीय जनतेसमोर – ठेवणारच. माझा परिवार तुमच्यासमोर उभे राहणार आहे. माझ्याकडे बोट दाखवण्यासाठी कोणालाच जागा नाही. हीच माझी खरी पत्रकारिता आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!